Wed, Jul 08, 2020 11:23होमपेज › Vidarbha › आमचे पालकमंत्री विरोधकांच्या कळपात कसे?

आमचे पालकमंत्री विरोधकांच्या कळपात कसे?

Published On: Jul 12 2018 1:44AM | Last Updated: Jul 12 2018 1:44AMनागपूर :

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मी पक्षाच्या पॅनलसोबत होतो. मात्र आमचे पालकमंत्री काँग्रेस - राष्ट्रवादीच्या कळपात कसे गेले ते कळलेच नाही. त्यांच्यावर विरोधकांनी काय जादू केली तेही कळले नाही, असा थेट हल्ला सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख यांच्यावर विधानसभेत चढविला. आपल्यावर सेबीने काहीही निर्बंध आणलेले नाहीत. शेअर्सधारकांचे पैसे परत करायला सांगितले असून आपण ते देत आहोत. शेतकर्‍यांचा एक पैसाही शिल्लक ठेवणार नाही, असेही ते म्हणाले.  सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेस- राष्ट्रवादी आणि विजय देहमुख यांच्या पॅनेलने सुभाष देशमुख यांचा पराभव केला. मात्र सोलापूरच्या या दोन मंत्र्यांमधील संघर्ष आज विधिमंडळातही समोर आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी विजय देशमुख यांनी या वादात ठिणगी टाकली. विजय देशमुख यांनी आपण कसे निवडून आलो आणि सुभाष देशमुख यांचा कसा पराभव झाला याची माहिती दिल्याचे सभागृहात सांगितले. त्यावर आता काय चाललेय ते मला कळाले असे, सुभाष देशमुख म्हणाले. मी पक्षाचे पॅनल उभे केले. पण विजय देशमुख यांना विरोधकांनी भुरळ घातली. पण मी हरलो नाही. सामान्य कार्यकर्ते निवडणुकीला उभे केले, असेही देशमुख म्हणाले. 

कर्जमाफीवरून विरोधकांवर हल्ला

बँकांनी दिलेल्या माहितीनुसार कर्जमाफी केली असती तर बँकांचेच भले झाले असते. शेतकर्‍याचे नाही. कर्जमाफीच्या ऑनलाईन प्रक्रियेमुळे बँकांच्या गैरप्रकारावर अंकूश बसला व त्यात सुमारे एक हजार कोटी रुपये वाचल्याचे देशमुख म्हणाले.  कर्जमाफीच्या अनुषंगाने नियम 293 अन्वये विरोधकांनी केलेल्या आरोपांना चोख प्रत्यूत्तर देत त्यांनी विरोधकांवर जोरदार टोलेबाजी केली. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या ताब्यातील जिल्हा बँकांमधील घोटाळ्यांमुळे येथील शेतकर्‍यांचे कसे वाटोळे झाले ते त्यांनी आकडेवारीनुसार सांगितले.