Wed, Sep 23, 2020 09:51होमपेज › Vidarbha › हिंगोलीत भटक्या कुत्र्यांचा हरणावर हल्ला

हिंगोलीत भटक्या कुत्र्यांचा हरणावर हल्ला

Last Updated: Aug 09 2020 10:16AM

संग्रहीत छायाचित्रहिंगोली : पुढारी वृत्तसेवा 

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे सध्या येथे लॉकडाऊन पुकारण्यात आला आहे. यामुळे शहरात सर्व रस्ते सामसूम झाले आहेत. भटक्या कुत्र्यांना खायलाही मिळत नसल्याने ते उग्र झाले आहेत. यामुळे भटक्या कुत्र्यांनी एका हरणाचा फडशा पाडल्याची घटना समोर आली आहे. यामुळे परिसरात भटक्या कुत्र्यांची दहशत पसरली आहे. या प्रकरणी नागरिकांना वन विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी त्या हरणीला उचलून नेले.

हिंगोली : लॉकडाऊनमुळे नागरिकांची खरेदीसाठी गर्दी 

हिंगोली जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून जिल्हाधिकारी यांनी ५ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून १४ दिवस संचारबंदी जाहीर केली आहे. जिल्हा लॉकडाऊन असल्यामुळे सध्या हिंगोली शहरात सर्व रस्ते सामसूम आहेत. यामुळे भटक्या कुत्र्यांना खायलाही काही मिळत नसल्याने ते उग्र झाले आहेत. यातून ते एकमेकांच्या अंगावर जात असून गाडीवरून येणाऱ्या जाणाऱ्यांवरही ते चाल करून जात आहेत. यामुळे परिसरात भटक्या कुत्र्यांची दहशत पसरली आहे. 

शहरातील राम गल्ली हा परिसर कयाधू नदीच्या काठावर असल्यामुळे हरणी या परिसरात शिरली. मात्र रामगल्लीच्या बाजूला जैन मंदिरासमोर मध्यरात्री फिरणाऱ्या हरणीचा भटक्या कुत्र्यांनी फडशा पाडला. हा सर्व प्रकार नागरिकांच्या सकाळी लक्षात येताच त्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. याची माहिती मिळताच अधिकाऱ्यांनी तेथे भेट देत त्या हरणीला उचलून नेले.   

 "