Mon, Jul 06, 2020 23:15होमपेज › Vidarbha › कोकणातील बंद पडलेली गिधाडांसाठीची उपाहारगृहे सुरू करा!

कोकणातील गिधाडांसाठीची उपाहारगृहे सुरू करा!

Published On: Jul 18 2018 1:55AM | Last Updated: Jul 18 2018 1:55AMनागपुर : विशेष प्रतिनिधी

गिधाड संवर्धन प्रकल्पान्तर्गत वन विभागाने सुरू केलेली कोकणातील रत्नागिरी, रायगड व सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू केलेली उपाहारगृहे बंद पडली असून ती पुन्हा सुरू करावीत, अशी मागणी भाजपचे विधान परिषद सदस्य प्रसाद लाड यांनी केली. लाड यांनी दाखविलेल्या पक्षीप्रेमाची विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दखल घेत त्यांचे कौतुक करताच दोन्ही बाजूकडील सदस्य बाके वाजवून लाड यांना प्रोत्सहित केले.

पारशी समाजात मृत्यूनंतर अंत्यविधिपश्चात शरीराची विल्हेवाट एका आगळ्या पद्धतीने केली जाते. पारशी स्मशानभूमीत एका भव्य विहिरीवर लोखंडाच्या गजांचे जाळीदार झाकण लावले जाते. त्यावर मृत शरीर ठेऊन त्यास गिधाडांना खाण्यासाठी सोडून दिले जाते. निसर्गाने दिलेले शरीर निसर्गास अर्पण करावे, अशी यामागील त्या समाजाची भावना आहे.कालांतराने शहरीकरण झपाट्याने वाढल्याने मुंबईमधील गिधाडाच्या प्रजननात पोषक असे नैसर्गिक वातावरण नष्ट झाल्यामुळे त्यांची संख्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

गिधाडाच्या संवर्धनासाठी कोकणातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्गात वन विभागाने उपाहारगृहे अर्थात व्हल्चर रेस्टोरेंट सुरू केली होती. मात्र बंद पडल्याने गिधाडे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. 

गिधाड संवर्धनासाठी  सरकारने उद्योगपतींकडून त्यांच्या कंपनीच्या सीएसआर फंडातून आर्थिक सहकार्य मिळवावे, अशी सूचना लाड 
यांनी केली.