Mon, Aug 10, 2020 08:30होमपेज › Vidarbha › गडचिरोलीतील सीआरपीएफच्या ११ जवानांना कोरोनाची लागण

गडचिरोलीतील सीआरपीएफच्या ११ जवानांना कोरोनाची लागण

Last Updated: Jul 14 2020 9:10AM

संग्रहित छायाचित्रनागपूर : पुढारी वृत्तसेवा 

गडचिरोली जिल्ह्यातील कृषी महाविद्यालय येथील सीआरपीएफ बटालियनमधील ११ नव्या बाधितांसह मंगळवारी (ता.१४) सकाळी २० नवे रूग्ण पॉझिटिव्ह रिपोर्ट आले. गडचिरोली येथीलच विलगीकरणात असलेला आरोग्य कर्मचारीही कोरोना बाधित आढळून आले आहेत. त्यातील एक आरोग्य कर्मचारी कुरखेडा येथील कडोली प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत आहे. काही कामानिमित्त गेल्या आठवड्याभरापूर्वी जिल्ह्याबाहेर प्रवास करून आलेला होता. त्यांना गडचिरोली येथील विलगीकरण ठेवण्यात आले होते.

अधिक वाचा :  कोरोनाचे सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात

काल (ता.१४) रात्री आलेल्या अहवालात धानोरा येथील २, मूलचेरा-२, गडचिरोली- २, एटापल्ली व अहेरी येथील एकेकाचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह मिळाले. तर आज सकाळी आलेल्या अहवालात १२ नवे पॉझिटीव्ह रूग्ण वाढले आहेत. गडचिरोली क्रियाशील कोरोना  असलेले रुग्ण ११४ आहेत. तर आतापर्यंत बरे होऊन डिस्चार्ज दिलेले ७१ रूग्ण आहेत. एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १८६ झाली असून या पैकी १ मृत्यू झाला आहे. या व्यतिरीक्त गडचिरोली जिल्ह्यात जिल्ह्याबाहेरील ९ कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.