Tue, Oct 20, 2020 12:17होमपेज › Vidarbha › शिवसेना म्हणजे कन्फ्यूज्ड पक्ष, देवेंद्र फडणवीसांचा आरोप

शिवसेना म्हणजे कन्फ्यूज्ड पक्ष, देवेंद्र फडणवीसांचा आरोप

Last Updated: Sep 21 2020 4:54PM
नागपूर : पुढारी ऑनलाईन 

महाराष्ट्राच्या इतिहासात आजवर कोणत्याही गृहमंत्र्यांनी स्वत:च्याच पोलिसांवर इतका अविश्वास दाखविला नाही. स्वत:च्याच पोलिस दलाचा असा अपमान करणे योग्य नाही, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केली. नागपूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी गृहमंत्र्यांवर टीकास्त्र सोडले. यावेळी माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, नागपूरचे महापौर संदीप जोशी आणि इतर नेते यावेळी उपस्थित होते. 

फडणवीस पुढे म्हणाले की, टेलिफोन टॅपिंगच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने कठोर नियम तयार केले आहेत. त्यात कोणतीही राजकीय व्यक्ती हस्तक्षेप करू शकत नाही. मुख्य सचिव, अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या पातळीवर ते अधिकार असतात. असे अधिकार गृहमंत्री अनिल देशमुखांनी घेतले असतील, तर ते चुकीचे आहे. 

शिवसेनेवर टीका करताना ते म्हणाले की, शिवसेना हा एक कन्फ्यूज्ड पक्ष आहे. लोकसभा आणि राज्यसभेत वेगवेगळी भूमिका घेतात. आमच्यासोबत सुद्धा जेव्हा सत्तेत होते, तेव्हा सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही भूमिका त्यांनी घेतल्या. त्यांना आधी भूमिका घ्यावी लागेल. शेतीसंदर्भात तर शिवसेनेने कधीच भूमिका घेतली नाही, असेही त्यांनी सांगीतले.

कृषी विधेयकांना काँग्रेसचा बेगडी विरोध : फडणवीस

नागपूर : उच्च न्यायालयाने नेमलेली समिती उद्या घेणार ६२ रुग्णालयांची सुनावणी

नागपूर : कुटुंबासाठी ‘जनता कर्फ्यू’ स्वयंस्फूर्तीने पाळा : महापौर संदीप जोशी

 "