Fri, Jul 10, 2020 18:48होमपेज › Vidarbha › माध्यान्ह आहारामध्ये दूध देणार : गडकरी

माध्यान्ह आहारामध्ये दूध देणार : गडकरी

Published On: Jul 20 2018 1:15AM | Last Updated: Jul 20 2018 1:14AMनागपूर : प्रतिनिधी

शाळेतील दुपारच्या भोजनामध्ये लहान मुलांना दूध आणि दुधापासून बनवलेल्या उत्पादन पदार्थावर 20 टक्के अनुदान, कांदा निर्यातीवर 5 टक्के, प्रोत्साहन राशी, सोयाबीनवर 10 टक्के प्रोत्साहन राशी अशी केंद्र सरकारने योजना बनवली असून दुधाचे पदार्थ निर्यात करण्यावर 40 टक्के निर्यात शुल्क लावण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज विधान भवन परिसरात पत्रकारांशी बोलताना दिली. दूध आणि दुधाचे पदार्थ निर्यात होत असून त्यावर 40 टक्के निर्यात शुल्क लावण्यात येणार आहे.

आदिवासी क्षेत्रात वेगवेगळ्या राज्यांमध्ये दूध देण्याची योजना सरकारने सुरू केली आहे. आज विधान भवनात विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत एक बैठक झाली. या बैठकीला केंद्रीय मंत्री हंसराज अहीर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, हरिभाऊ बागडे उपस्थित होते. 

सहकारी संस्था व महासंघाजवळ कॅपिटल नियोजन करण्यात आले असून सहकारी संस्थेला 5 टक्के व्याजावर कर्ज देण्यात येणार आहे. या करिता 300 कोटी रुपयाचे नियोजन करण्यात आले आहे. कांद्याला निर्यात करण्यावर 5 टक्के प्रोत्साहन देण्यात येणार आहे. तर सोयाबीन 10 टक्के प्रोत्साहन देण्यात येणार आहे.