Sat, Jul 04, 2020 03:31होमपेज › Vidarbha › विधानसभेसाठी रयतक्रांतीची १२ जागांची मागणी

विधानसभेसाठी रयतक्रांतीची १२ जागांची मागणी

Published On: Jul 19 2019 10:30AM | Last Updated: Jul 19 2019 11:07AM
बुलडाणा : प्रतिनिधी

महायुतीमध्ये सामिल असलेल्या रयतक्रांती संघटनेने विधानसभा निवडणूकीसाठी राज्यात १२ जागांची मागणी केली आहे, अशी माहिती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी बुलडाणा येथे पत्रकारांशी बोलतांना दिली. तर बुलडाणा जिल्ह्यात मेहकर व चिखली मतदारसंघात रयतक्रांती संघटना निवडणूक लढणार असल्याचे खोत म्हणाले. 

रयतक्रांती संघटनेने वाळवा (सांगली), फलटण, दक्षिण कराड,  मान (सातारा), नायगाव (नांदेड), मानखुर्द (मुंबई), मेहकर, चिखली (बुलडाणा) या मतदार संघाची मागणी केली आहे.

कृषी राज्यमंत्री खोत काल, गुरूवारी (दि.१८) बुलडाणा जिल्ह्याच्या दौ-यावर होते. कृषी विभागाचे वतीने आयोजित विविध कार्यक्रमात ते उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कृषी व पाणीपुरवठा विभागाच्या आढावा बैठकीत खोत यांनी मार्गदर्शन केले. तत्पूर्वी माळविहीर येथील एका शेताला भेट देऊन मंत्री खोत यांनी सोयाबीन पिकाची कोळपणी केली.