Sat, Sep 19, 2020 11:48होमपेज › Vidarbha › नागपुरात सप्टेंबर महिन्यात शनिवार, रविवार जनता कर्फ्यू 

नागपुरात सप्टेंबर महिन्यात शनिवार, रविवार जनता कर्फ्यू 

Last Updated: Sep 16 2020 9:09PM
नागपुर : पुढारी वृत्तसेवा

नागपुरातील दरदिवशी कोरोनाची वाढती रूग्णसंख्या लक्षात घेता यापुढे सप्टेंबर महिन्यात दर शनिवार, रविवार दोन दिवस जनता कर्फ्यू राहणार आहे. नागपूरचे  महापौर संदिप जोशी यांनी आज आमदारांच्या बैठकीत हा निर्णय घेतला.

नागपूर शहरातील आमदार, लोकप्रतिनिधी, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी आणि महापौर संदीप जोशी यांच्यात आज बैठक झाली. नागपुरातील रूग्ण संख्या आता पन्नास हजाराच्या पार झाली आहे. महाराष्ट्रातील जास्त रूग्णसंख्येचे हे तिसरे शहर झाले आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जनता कर्फ्युचा निर्णय घेण्यात आला आहे असे मनपा प्रशासनाने सांगितले.

जिल्ह्यात आज १५९४ रुग्णांना डिस्चार्ज, २०५२ पॉझिटिव्ह तर ६० मृत्यू

नागपूर जिल्ह्यात आज  १५९४ रुग्ण  बरे होऊन घरी गेले, तर आज २०५२ नवीन रुग्णांची भर पडली असून, एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या ५७४८२ झाली आहे. आता पर्यंत   बरे होऊन घरी  गेलेल्या रुग्णांची संख्या  ४३९२७  झाली आहे. एकूण क्रियाशील रुग्ण ११७४० असून या पैकी ६१४३ गृह विलगिकरणात आहेत. आज ६० मृत्‍यू 
झाले असून, त्यापैकी ९ मृत्यू जिल्ह्याबाहेरचे आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७६ टक्के आहे.

 "