Thu, Jul 02, 2020 11:51होमपेज › Vidarbha › नक्षलवाद्यांकडून एकाची गळा चिरून हत्या

नक्षलवाद्यांकडून एकाची गळा चिरून हत्या

Published On: Dec 10 2018 8:03PM | Last Updated: Dec 10 2018 8:03PM
नागपूर : प्रतिनिधी

गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवाया सुरूच आहेत. वाहने जाळपोळीच्या घटनेनंतर नक्षलवाद्यांनी खोब्रामेंढा येथील एका व्यक्तीची गळा चिरून हत्या केली आहे. ही घटना रविवारी रात्री कुरखेडा तालुक्यातील खोब्रामेंढा देवस्थान या मार्गावर घडली. अंताराम पुडो असे मृताचे नाव आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अंताराम पुडो हे एका तेंदूपत्ता कंत्राटदाराकडे दिवाणजी म्हणून काम करत होते. त्याने अनेक तेंदूपत्ता कामगारांना मजुरी न दिल्याची तक्रार गावकर्‍यांनी केली होती, अशी माहिती आहे. यामुळे रविवारी रात्री नक्षलवाद्यांनी अंताराम पुडो याला खोब्रामेंढा देवस्थानकडे जाणार्‍या मार्गावर बोलवून त्याची गळा चिरून हत्या केली.

ही घटना सोमवारी सकाळी लक्षात येताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत  मृतदेह ताब्यात घेतला. २ ते ८ डिसेंबर दरम्यान नक्षलवाद्यांचा पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मीचा स्थापना सप्ताह (पीएलजीए) साजरा करण्यात आला. या सप्ताहाच्या सुरूवातीलाच एटापल्ली तालुक्यातील वटेपल्ली ते गट्टेपल्ली या रस्त्यावरील १६ वाहने नक्षलवाद्यांनी जाळली होती.