Wed, Jul 08, 2020 03:37होमपेज › Vidarbha › वाघाच्या हल्ल्यात वृद्ध गुराखी जखमी

वाघाच्या हल्ल्यात वृद्ध गुराखी जखमी

Published On: Aug 19 2019 1:31AM | Last Updated: Aug 25 2019 1:56AM

संग्रहित छायाचित्रनागपूर : पुढारी वृत्तसेवा 

चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर शहराला लागून असलेल्या उमा नदीच्या काठावर गेल्या दोन दिवसांपासून पट्टेदार वाघाने बस्तान मांडले आहे. वाघाने दोन दिवसांत एक गाय व एका म्हशीची शिकार केली. गुराखी वृद्ध बाबा नीळकंठ गोठे यांच्यावर वाघाने हल्ला केला. गोठे हे जखमी असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

चिमूर नगर परिषद क्षेत्रातील शहरालगत असलेल्या प्रभाग 11 मधील उमा नदीच्या काठावरील गुलाब लोथे यांच्या शिवारात गुरुवारी सकाळी एक वाघ गाईचे मांस खाताना नागरिकांना दिसला होता.