Tue, Sep 22, 2020 05:58होमपेज › Vidarbha › नागपूर : फुटपाथवर संसार असलेल्‍या परिवारांना पोलिसांचा मदतीचा हात

नागपूर : फुटपाथवर संसार असलेल्‍या परिवारांना पोलिसांचा मदतीचा हात

Last Updated: Mar 25 2020 8:31PM
नागपूर : विशेष प्रतिनिधी

कोरोना विषाणूचा संसर्ग कमी करण्याकरीता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारपासून संपुर्ण देशात लॉकडाऊन केले आहे. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी लॉकडाऊन सारख्या उपाययोजना करण्यात येत आहे. मात्र या लॉकडाऊनमुळे गोरगरीब जनता आणि फुटपाथवर रहाणार्‍या कष्टकरी वर्गाला फटका बसला आहे. हातावर पोट असणाऱ्या या गोरगरीब जनतेलाही त्यांच्या दैनंदिन गरजा पुर्ण करता याव्यात याकरीता नागपुर पोलिसांनी पुढाकार घेतला आहे. 

राष्ट्रसेविका समितीच्या सदस्यांनीही या सामाजीक कार्यात पोलिसांना सहकार्य केले आहे. नागपुरातील फुटपाथवर रहाणा-या या गरीब आणि गरजू परिवारांना नागपूर पोलिसांनी मदतीचा हाथ दिला आहे. नागपुरातील बजाजनगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राघवेंद्र सिंह श्रीरसागर यांनी पुढाकार घेऊन फुटपाथवर राहणार्‍या गोरगरीब परिवारांना फुड पॅकेटचे बुधवारी वाटप केले. 

बजाजनगर, अत्रेलेआउट, नरेंद्र नगर, सिव्हील लाईन्स परिसरातील संपन्न कुटुंबांकडून पोलिसांनी हे फूड पॅकेट गोळा केले आहेत. राष्ट्रसेविका समितीच्या महिला कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या या उपक्रमाला हातभार लावला आहे. पुढील २१ दिवस सर्वत्रच हे लॉकडाऊन असणार आहे. त्यामुळे फुटपाथवर संसार असलेल्या अशा गोरगरीब परिवाराच्या मदतीकरीता नागपुरातील समाजसेवी संस्था, सेवाभावी संघटना, सामाजीक कार्यकर्ते आणि संपन्न कुटुंबांनी मदतीसाठी पुढे यावे असे आवाहन नागपूर पोलिसांनी केले आहे.

 "