Thu, Sep 24, 2020 11:30होमपेज › Vidarbha › आपण एका गाडीत बसू शकलो नाही, मात्र एकाच स्‍टेशनवर एकत्र आलो - उद्धव ठाकरे 

आपण एका गाडीत बसू शकलो नाही, मात्र एकाच स्‍टेशनवर एकत्र आलो - उद्धव ठाकरे 

Last Updated: Jan 28 2020 12:35PM

मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरेनागपूर : पुढारी ऑनलाईन

नागपूर मेट्रोचे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते व्हिडिओ लिंकद्वारे उद्घाटन झाले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना उद्देशून, आपण एका गाडीमध्ये बसू शकत नाही. पण एकाच स्टेशनवर एकत्र आलो, असे वक्तव्य केले.आम्ही कामाच्या बाबतीत एकमेकांची साथ सोडणार नाही, अशी आशा देखील त्यांनी व्यक्त केली. आम्हाला श्रेय घ्यायचे नाही. जनतेचे आशीर्वाद घ्यायचे आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्र्यांचे भाषण होण्यापूर्वी केंद्रीय नितीन गडकरी यांचे भाषण झाले. यावेळी गडकरी यांनी फडणवीस सरकारच्या काळात झालेल्या निर्णयांचे कौतूक केले. त्याचबरोबर सध्याच्या सरकारने विकासकामांचे प्रस्ताव पाठवावेत, असे आवाहनही केले. 

त्यानंतर बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, नितीन गडकरी यांनी वेळेच्या आत काम पूर्ण केले आहे. तुम्ही म्हणाल असा कसा मुख्यमंत्री आहे. श्रेयच घेत नाही. राजकारणी म्हटल्यावर श्रेयवाद येतोच. पण, आम्हाला श्रेय नकोय, आम्हाला जनतेचे आशीर्वाद हवे आहेत. नागपूरकरांच्या आशीर्वादांची आम्हाला गरज आहे, असे सांगत नितीन गडकरी यांचे नाव न घेता मुख्यमंत्री म्हणाले, आज आपण एका गाडीत बसू शकलो नाही, पण एका स्टेशनवर एकत्र आलो आहोत. 

नितिन गडकरी यांच्‍या उपस्‍थितीत नागपूर मेट्रोचा शुभारंभ झाला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.  नागपूर मेट्रोला 'माझी मेट्रो' असे नाव देण्‍यात आल्‍याचा उल्‍लेख देखील त्‍यांनी केला. ही माझेपणाची भावना सर्वांच्‍यात निर्माण झाली पाहिजे असे देखील म्‍हणाले. 

 "