Tue, Sep 22, 2020 10:22होमपेज › Vidarbha › नागपूर : उच्चांकी ३४० कोरोना पॉझिटिव्ह; १७ मृत्‍यू  

नागपूर : उच्चांकी ३४० कोरोना पॉझिटिव्ह; १७ मृत्‍यू  

Last Updated: Aug 04 2020 8:48PM
नागपूर : पुढारी वृत्तसेवा 

कोविड-१९ या संसर्गजन्य आजाराचे नागपूर जिल्ह्यात आज (मंगळवार) ३४० नवे रुग्ण आढळले आहेत. शहरी भागातील २३५ तर ग्रामीण भागातील १०५ रुग्णांचा यात समावेश आहे. जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६४८३ एवढी झाली आहे. (ग्रामीण २०१०, शहरी ४४७३ व ११३ नागपूर जिल्ह्याबाहेरील) तर आज १२० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ग्रामीण १६५५ व शहरी २२१९ असे एकूण ३८७४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आज  ग्रामीण २ तर शहरी भागातील १५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्‍यामुळे ग्रामिण भागात एकूण मृत्यूची संख्या ३२ तर शहरी भागात १५७  असे एकूण १८९ मृत्‍यू झाले आहेत.

आज ग्रामीण भागातील ६०३ व शहरी भागातील १०९० असे एकूण १६९३ व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासण्यात आले. त्‍यामध्ये आतापर्यंत ग्रामीण भागात ३७१६७ व शहरी ५१८७० असे एकूण ८९०३७ नमुने तपासले आहेत. सद्यस्थितीत ग्रामीण ६१३ व शहरी १८०७ रुग्ण असे एकूण २४२० रुग्ण उपचार घेत आहेत.

जिल्ह्यात कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटरची संख्या २५ असून, या ठिकाणी सध्या २४२० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण उपचाराखाली आहेत. रुग्ण बरे होण्याचा नागपूर जिल्ह्याचा दर ६० टक्के एवढा आहे. कोरोना हा संसर्गजन्य आजार असून, या आजारापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी मास्क वापरणे, नियमित हात धुणे व सुरक्षित अंतर ठेवणे आवश्यक आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी व लक्षणे आढळल्यास साथरोग नियंत्रण कशास संपर्क साधावा असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

 "