होमपेज › Vidarbha › नागपूर : किरकोळ वादात अंगावर फेकला अमोनिया

नागपूर : किरकोळ वादात अंगावर फेकला अमोनिया

Last Updated: Jan 17 2020 1:15AM

संग्रहित छायाचित्रनागपूर : विशेष प्रतिनिधी

किरकोळ शाब्दिक वादावरून एका प्रयोगशाळा सहाय्यिकेने तिच्या वरिष्ठ शिक्षकांवर अमोनिया फेकला असल्याची घटना बुधवारी (ता.१५) नागपुरात घडली. सदर पोलिसस्टेशन अंतर्गत असलेल्या शासकिय तंत्रनिकेतनमधील प्रयोगशाळेत ही घटना घडली आहे. या प्रकरणी प्रशासनाने लगेचच पोलिसांना पाचारण केले. 

सुरवातीला हा अॅसीड हल्ला असल्याची चर्चा पसरली. मात्र पोलीसांनी या प्रकरणी तत्काळ तपासणी केली असता प्रयोगशाळा विभागप्रमुखाच्या अंगावर अॅसिड नव्हे, तर अमोनिया फेकले असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी सध्या पॉलिटेक्निकमध्ये पोलिस कर्मचारी आणि तक्रारदार यांचे जबाब घेत असुन चौकशीअंती हे प्रकरण पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात येईल असे सदर पोलिस स्टेशनचे ठाणेदार एम एस बनसोडे यांनी दै पुढारीशी बोलताना सांगितले.