Wed, May 12, 2021 01:57
मृत्यूचा थरार! लेडी डाॅन पिंकी जिवाच्या आकांताने धावत होती अन् गुंडांची टोळी तिच्या पाठीवर सपासप वार करत होती, शेवटी...

Last Updated: Apr 20 2021 11:04AM

नागपूर ः पुढारी ऑनलाईन 

गुन्हेगारीविश्वात फक्त पुरुषांचाच दरारा असतो असं नाही, महिलादेखील पुरुषांच्या बरोबरीने आपली दहशत निर्माण करण्यात यशस्वी झालेल्या आहेत. मग, गुन्हेगारीविश्वात पुरुषांचा जसा अंत होतो, तसाच अंत स्त्रियांच्या वाट्याला येतो, हे नागपूरमध्ये लेडी डाॅनची भर रस्त्यात झालेल्या हत्येवरून लक्षात येतं. पिंकी वर्मा असं नाव असलेल्या लेडी डाॅनच्या मागे धारदार शस्त्र घेऊन गुंडांनी पाठलाग सुरू केला, पिंकी पुढे पळत होती, मागून गुंड तिच्या पाठी सपासप वार करत होते. रक्ताने माखलेली पिंकी शेवटी आपल्या घरात शिरली आणि कोसळली, गुंडानी तिच संधी साधत पुन्हा सपासप वार केले. त्यात पिंकीचा मृत्यू झाला. 

वाचा ः सीरियल किलर ः कोंबडा खाऊन गुन्ह्याची कबुली देण्याऱ्या 'या' मनोरुग्णाने ४१ लोकांची केली होती हत्या; झोपडपट्टीतील लोक होते निशाण्यावर

मिळालेली माहिती अशी की, पिंकी वर्मा नाव असलेल्या लेडी डाॅनने नागपूरच्या पाचपावली भागात चांगलीच दहशत निर्माण केली होती. तिने स्वतःची गॅंग तयार केली होती, त्यांच्या जोरावर पिंकीने दारुचा आणि जुगाराचा व्यवसाय वाढविला. तिच्या गॅंगमधील अनेकांवर पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे नोंद आहेत. पिंकी तापट स्वभावाची होती, त्यातील कुणाच्याही अंगावर धावून जायची आणि बोलायला ही फटकळ स्वभावाची होती. पाचपावली भागात पिंकीचा अवैध व्यवसाय तेजीत चालला होता. कोरोनाने तर तिचा दारूचा धंदा वेगाने चालला. 

वाचा ः सीरियल किलर ः 'या' ठगाने तब्बल ९३१ हत्या केल्या अन् गिनीज बुकने त्याची दखल घेतली; शेवटी ब्रिटिशांनी 'ठगांचा बंदोबस्त' कायदा केला 

हे पाहून पिंकीच्या स्थानिक स्पर्धक टोळीशी तिची चांगलंच शत्रूत्व वाढलं. दोन गटात सतत खटके उडू लागले. भांडणं होऊ लागली. पिंकी एक स्त्री असल्यामुळे सुरुवातील कोणी तिच्याकडे लक्ष दिले नाही. पण, पिंकीचा व्यवसाय चांगलाच तेजीत चालला. हीच बाब स्पर्धक गटाला पाहवली नाही. जुना वाद उकरून या टोळीच्या गुंडांनी पिंकीचा काटा ठरवला. 

वाचा ः सीरियल किलर ः 'या' ठगाने तब्बल ९३१ हत्या केल्या अन् गिनीज बुकने त्याची दखल घेतली; शेवटी ब्रिटिशांनी 'ठगांचा बंदोबस्त' कायदा केला 

पिंकी वर्मा नेहमीप्रमाणे आपल्या गॅंगसोबत कट्ट्यावर बोलत बसलेली होती. विरोधी टोळीला आयती संधी मिळाली. त्यांनी संधी साधत हातात धारदार शस्त्रं घेत पिंकीच्या दिशेने यायला सुरूवात केली. गुंड आपल्या दिशेने येत असल्याचे दिसताच पिंकीने पळण्यास सुरुवात केली. गुंडांनी तिचा पाठलाग सुरू केला. पिंकी जसजशी पुढे धावत होती, तस तसे गुंड पिंकीच्या पाठीवर धारदार शस्त्रांनी सपासप वार करत होते. पिंकी प्रत्येकाच्या घराचे दरवाजे ठोठावत होती. मात्र, तिच्या मदतीला कोणीही धावून आले नाही. पाठीवर जबर वार झाल्याने पिंकी रक्ताने चिंब भिजली होती. तरीही ती धावतच होती आणि गुंड तिच्यामागून धावत तिच्यावर सपासप वार करत होते. 

वाचा ः भयानकतेचा इतिहास ! ३० मुलींवर आधी बलात्कार, नंतर हत्या, त्यानंतर पुन्हा शरीर सडेपर्यंत बलात्कार... कोण आहे 'हा' सीरियल किलर?

शेवटी पिंकी स्वतःच्या घराजवळ पोहोचली आणि तिने घराचा दरवाजा उघडून आत शिरली. घरात शिरताच पिंकी कोसळली. गुंडांनी कोणतीच दया-माया न दाखवता पुन्हा सपासप वार करायला सुरुवात केली. त्यातच पिंकीचा मृत्यू झाला. एखाद्या चित्रपटात थरारक घटना घडावी, अशी पिंकीची हत्या झाल्यामुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे.