Sat, Dec 07, 2019 09:45होमपेज › Vidarbha › डॉक्टरांनी नक्षलवादी व्हावे, आम्ही गोळ्या घालू: हंसराज अहिर

'डॉक्टरांनी नक्षलवादी व्हावे, आम्ही गोळ्या घालू'

Published On: Dec 26 2017 1:35AM | Last Updated: Dec 26 2017 2:04AM

बुकमार्क करा

नागपूर : प्रतिनिधी

मी रुग्णालयात येणार हे माहीत असूनदेखील डॉक्टर रजेवर जातात. त्यांचा लोकशाहीवर विश्‍वास नसेल, तर त्यांनी खुशाल नक्षलवादी संघटनेत भरती व्हावे, आम्ही त्यांना गोळ्या घालून ठार मारू, असे वादग्रस्त विधान केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी केले आहे.

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त चंद्रपूरमधील सरकारी रुग्णालयात सोमवारी मेडिकल स्टोअरचा शुभारंभ झाला. केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या हस्ते मेडिकल स्टोअरचे उद्घाटन झाले. या दुकानात रुग्णांना 24 तास स्वस्त दरात औषधे मिळू शकतील.

हंसराज अहिर हे या कार्यक्रमाला येणार असतानाच रुग्णालयातील डॉक्टर रजेवर होते. यामुळे हंसराज अहिर नाराज झाले. उद्घाटन सोहळ्यानंतर त्यांनी दांडी मारणार्‍या डॉक्टरांवर नाराजी व्यक्‍त केली. मी जनतेने निवडून दिलेला खासदार असून मी केंद्रीय राज्यमंत्रिपदावर आहे. 

मी इथे येणार हे माहीत असूनही डॉक्टर रजेवर कसे जाऊ शकतात, त्यांचा लोकशाहीवर विश्‍वास नसेल तर त्यांनी खुशाल नक्षलवादी संघटनेत भरती व्हावे, आम्ही गोळ्या घालून ठार मारू, अशा शब्दांत त्यांनी डॉक्टरांना सुनावले.