Wed, Jul 15, 2020 16:12होमपेज › Vidarbha › विधानपरिषद बिनविरोध?; भाजपकडून ५ उमेदवार जाहीर

विधानपरिषद बिनविरोध?; भाजपकडून ५ उमेदवार

Published On: Jul 04 2018 2:43PM | Last Updated: Jul 04 2018 3:25PMनागपूर : पुढारी ऑनलाईन

विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी १६ जुलैसाठी निवडणूक होणार आहे. यातील ११ जागापैकी ५ जागी भाजप, शिवसेना, काँग्रेस प्रत्येकी २ जागांवर तर राष्ट्रवादी, शेकापकडून प्रत्येकी १ उमेदवार दिला जाण्याची शक्यता आहे. ११ जागांसाठी एकूण ११ उमेदवार असल्याने ही निवडणूक बिनविरोध होऊ शकते.

वाचा : शिवसेनेला भाजपची उपसभापतिपदाची ऑफर

भाजपने विधान परिषदेसाठी भाई गिरकर, महादेव जानकर, कोळी महासंघ अध्यक्ष ठाणे रमेश पाटील, राम पाटील - रातोळीकर नांदेड, निलय नाईक यांना उमेदवारी दिली आहे. तर शिवसेनेकडून अनिल परब आणि मनिषा कायंदे यांची नावे चर्चेत आहेत. काँग्रेसच्या शरद रणपिसे आणि डॉ. वजाहत मिर्झा यांच्याही नावाची चर्चा आहे.

वाचा : काँग्रेसच्या हर्षवर्धन पाटलांसाठी राष्ट्रवादीचा आग्रह 

काँग्रेसच्या माणिकराव ठाकरे, संजय दत्त, शरद णपिसे शिवसेनेचे अनिल परब, राष्ट्रवादीचे जयदेव गायकवाड, नरेंद्र पाटील, सुनिल तटकरे, अमरसिंह पंडित, शेकापचे जयंत पाटील आणि रासपचे महादेव जानकर यांचा कार्यकाळ संपणार आहे. २७ जुलैरोजी त्यांचा कार्यकाळ संपण्यापूर्वी १६ जुलैला निवडणूक होणार आहे. यासाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख ५ जुलै आहे.