Sun, Jul 12, 2020 19:24होमपेज › Vidarbha › मुख्यमंत्र्यांकडून गडकरींच्या प्रकृतीची विचारपूस 

मुख्यमंत्र्यांकडून गडकरींच्या प्रकृतीची विचारपूस 

Published On: Aug 03 2019 8:51AM | Last Updated: Aug 19 2019 1:31AM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.नागपूर : पुढारी ऑनलाईन

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग विकासमंत्री नितीन गडकरी यांना गुरुवारी सोलापूर दौऱ्यावर राष्ट्रगीत सुरू असतानाच भोवळ आली होती. राष्ट्रगीत सुरू असताना ते कोसळले होते. त्यामुळे नियोजित दौरा सोडून गडकरी नागपूरला रवाना झाले होते.  

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा सध्या विदर्भामध्ये आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच त्यांनी महाजनादेश यात्रेसाठी गडकरी यांचे आशीर्वादही घेतले. 

पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात समारोपप्रसंगी राष्ट्रगीत सुरू असताना गडकरींना भोवळ आली. ते खाली पडणार इतक्यात मागून त्यांच्या सुरक्षारक्षकांनी त्यांना आधार दिला व खुर्चीवर बसविले. वयाच्या बासष्ठीत असलेल्या नितीन गडकरी यांना मधुमेहाचा आजार असून २०११ मध्ये वजन कमी करण्यासाठी त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली आहे.

बुधवारी त्यांच्या घशाला सूज आल्याने त्यांना काही प्रतिजैवके देण्यात आली होती. त्यांचा डोस जास्त झाल्यामुळे त्यांना अशक्‍तपणा जाणवत होता. त्यामुळे विद्यापीठातील कार्यक्रमादरम्यान त्यांना भोवळ आली.