Mon, Jul 13, 2020 23:18होमपेज › Vidarbha › अकोला : तरुणाकडून ईव्हीएम यंत्र फोडण्याचा प्रयत्‍न

अकोला : तरुणाकडून ईव्हीएम फोडण्याचा प्रयत्‍न

Published On: Apr 18 2019 12:53PM | Last Updated: Apr 18 2019 12:53PM
अकोला : पुढारी ऑनलाईन 

लोकसभा निवडणुकीच्या दुसर्‍या टप्प्यात आज, गुरुवारी १२ राज्यांतील ९५ जागांसाठी आज मतदान होत आहे. अकोल्‍यात बाळापूर येथे एका तरुणांकडून मतदान केंद्रावर 'ईव्हीएम' फोडण्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे. 

देशभरात लोकसभेचे दुसर्‍या टप्‍प्‍यातील मतदानाची लगबग सुरु असताना अकोल्‍यात एक तरुणांने 'ईव्हीएम' मशीन फोडण्‍याची घटना घडली आहे. या तरुणाचे नाव श्रीकृष्ण प्यारे असे आहे. या घडलेल्‍या प्रकारानंतर पोलिसांनी या तरुणाला ताब्‍यात घेतले आहे. श्रीकृष्ण घैरे याचा ईव्हीएमला विरोध होता. यातूनच त्याने हे कृत्य केल्‍याची चर्चा आहे. 

बाळापूरमधील कवठा येथे श्रीकृष्ण घैरे हा तरुण मतदान करण्‍यासाठी मतदान केंद्रावर पोहोचला. मतदान करण्‍यास मतदान कक्षाजवळ जाताच श्रीकृष्णाने ईव्हीएम फोडण्याचा प्रयत्न केला. पोलिसांने त्‍याला तात्‍काळ ताब्‍यात घेतले. या घटनेनंतर काही वेळातच नवीन मतदान यंत्र पाठवण्‍यात आले. मतदान प्रक्रिया सुरु झाली. 

अकोला मतदारसंघात तिरंगी सामना 

अकोला मतदारसंघात तिरंगी सामना रंगणार आहे. भाजपाचे संजय धोत्रे, वंचित बहुजन आघाडीचे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसचे हिदायत पटेल  निवडणुकीच्‍या मैदानात आहेत.