Sat, Jul 04, 2020 08:17होमपेज › Vidarbha › सिंचन घोटाळा : अन्य तपास यंत्रणांना प्रतिवादी करण्यास न्यायालयाचा नकार

सिंचन घोटाळा : अन्य तपास यंत्रणांना प्रतिवादी करण्यास न्यायालयाचा नकार

Last Updated: Feb 16 2020 1:53AM

मुंबई उच्च न्यायालयनागपूर : विशेष प्रतिनिधी

विदर्भातील नागपूर आणि अमरावती जिल्ह्यात झालेल्या कथित सिंचन घोटाळा प्रकरणात अन्य तपास यंत्रणांना प्रतिवादी करण्याची मागणी फेटाळून लावण्यात आली. ही याचिका सिंचन घोटाळ्यातील याचिकाकर्ते अतुल जगताप यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडे केली होती. 

अधिक वाचा : नागपूर : आता महिला डॉक्टरवर केलेल्या ॲसिड हल्ल्यात तिघी जखमी

याचिकाकर्ते अतुल जगताप यांनी खंडपीठाकडे याचिकेतून सीबीआय, सक्तवसुली संचलनालय, एसएफआयओ, आयकर विभागाचे मुख्य आयुक्त आणि केंद्र सरकारला प्रतिवादी करण्याची विनंती केली होती. ही याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरूवारी फेटाळली. या तपास यंत्रणांना प्रतिवादी करण्याची आवश्यकता नाही असे न्यायालयाने म्हटले आहे. आवश्यक वाटल्यास अन्य तपास यंत्रणांना तसे आदेश देऊ असेही न्यायालयाने सांगितले. 

अधिक वाचा : हिंगणघाट जळीतकांड : आरोपी म्‍हणाला...

सध्या सिंचन घोटाळा प्रकरणाची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक खात्यामार्फत करण्यात येत आहे. या प्रकरणात सीबीआय, ईडी, एसएफआयओ आणि आयकर विभागाचे मुख्य आयुक्त आणि केंद्र सरकारला प्रतिवादी करण्यात यावे, विनंती याचिकाकर्ते अतुल जगताप यांनी केली होती. मात्र न्यायालयाने ही विनंती अमान्य केली. आता या याचिकेवर १३ मार्च रोजी अंतिम सुनावणी होणार आहे.