Sun, Jul 12, 2020 18:13होमपेज › Vidarbha › गोंदिया जिल्ह्यात विहिरीतून निघते गरम पाणी

गोंदिया जिल्ह्यात विहिरीतून निघते गरम पाणी

Published On: Sep 03 2018 10:02PM | Last Updated: Sep 03 2018 10:02PMनागपूर : प्रतिनिधी

गोंदिया जिल्ह्यातील आमगाव येथील एका विहिरीमधून गरम पाणी निघत असल्याचे निदर्शनास आले आहे. आमगाव येथील मंगल हेडाऊ यांच्या राहत्या घरातील विहिरीत गरम पाणी निघत आहे. या घटनेची माहिती मिळताच गावकर्‍यांनी हेडाऊ यांच्या विहिरी जवळ एकच गर्दी केली. विहिरीतून अचानक गरम पाणी निघत असल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

हेडाऊ कुटुंबातील महिला मंगल हेडाऊ या सकाळी विहिरीतून पाणी काढण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी त्यांना विहिरीतून वाफ निघत असल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी लगेच ही घटना घरच्या मंडळीना सांगितली. त्यावेळी राजु हेडाऊ यांनी विहिरीतून बादलीत काढलेल्या पाण्यात हात घालून पाहिले असता, ते पाणी गरम असल्याचे निदर्शनास आले. या घटनेची माहिती गावात पसरताच गावकर्‍यांनी हेडाऊ यांच्या विहिरीजवळ गर्दी केली. ऐन पासाळ्यात विहिरीतून गरम पाणी निघत असल्यामुळे नागरिकांनी आश्‍चर्य व्यक्त होत आहे.