Fri, Jul 03, 2020 03:16होमपेज › Vidarbha › खासदार नवनीत राणांकडून पतीचे केशकर्तन (video)

खासदार नवनीत राणांकडून पतीचे केशकर्तन (video)

Last Updated: May 29 2020 6:07PM
नागपूर : पुढारी वृत्तसेवा

सध्या सर्वत्र कोरोनाची धास्‍ती आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून देशातील सलूनची दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. त्‍यामुळे सर्व सामान्यांपासून व्हीआयपी व्यक्‍तींचीही पंचाईत झाली आहे. तब्‍बल अडीच महिन्यांपासून सलूनची दुकाने बंद असल्‍याने अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी पती आमदार रविकुमार राणा यांचे घरीच केशकर्तन करून दिले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

खासदार नवनीत राणा या सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी नेहमीच कार्यरत असतात. संसदेतही अनेक प्रश्नावर त्‍यांनी आवाज उठवला आहे. त्‍यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला असून, देशात कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी सलूनची दुकाने गेल्‍या दोन ते अडीच महिन्यांपासून बंद ठेवण्यात आली आहेत. त्‍यामुळे पती रविकुमार राणा यांचे केस त्‍यांनी घरातच कापले. आपल्‍या पतींना गेल्‍या काही दिवसांपासून सलून बंद असल्‍याने केस कापता आले नाहीत. त्‍यामुळे त्‍यांना अनेक मिटींग आणि कामा निमित्‍त असेच बाहेर जावे लागत असल्‍याने आपण आज घरीच त्‍यांना केस कापून देणार असल्‍याचे व्हिडिओत त्‍या बोलत असल्‍याचे दिसून येत आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी जनतेला आत्मनिर्भर होण्याचा एक आगळावेगळा संदेश दिला आहे.

दरम्‍यान, हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून, या आधीही अनेक लोकांनी कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी घरातल्‍या इतर सदस्‍यांच्या मदतीने घरातच केस कापल्‍याचे व्हिडिओ आणि फोटो समोर आले होते.