होमपेज › Vidarbha › वाशीममध्ये तीन तलाकचा पहिला गुन्हा दाखल

वाशीममध्ये तीन तलाकचा पहिला गुन्हा दाखल

Last Updated: Dec 03 2019 3:09PM
वाशिम : प्रतिनिधी 

माहेरून प्रत्येक महिन्याला पाच हजार रुपये आणत नाही म्हणून, मी तुला तलाक देतो असे म्हणत तलाक देणाऱ्या पती विरोधात मुस्लीम महिला विवाहाचे अधिकार कायदा २०१९ नुसार वाशीम पोलिस स्टेशन मध्ये पहिलाच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सादिया खान नूर महोम्मद यांनी आरोपी पती नूर महोम्मद कादरी व सासू सासऱ्याच्या विरोधात हा गुन्हा दाखल केला आहे.

माहेरून पैसे आणत नाही म्हणून फारकती मिळण्यासाठी कोर्टात अर्ज केला असता कोर्टाने तो खारीज केला. फिर्यादी सादिया खान व त्यांचे वडील पतीच्या घरी गेले असता. 'मैने तुम्हे तलाक दिया' असे म्हणत फिर्यादी सादिया व तिच्या वडिलांना अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे मुस्लीम महिला विवाहाचे अधिकार संरक्षण कायदा २०१९ सह विविध कलमान्वये वाशीम शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.