Thu, Jun 24, 2021 12:27होमपेज › Vidarbha › ‘दलित’ शब्दावर येणार बंदी!

‘दलित’ शब्दावर येणार बंदी!

Published On: Dec 17 2017 2:59AM | Last Updated: Dec 17 2017 2:18AM

बुकमार्क करा

नागपूर : प्रतिनिधी

शासकीय कामकाज, विविध योजना व दस्तावेजातून दलित हा शब्द लवकरच वगळण्यात येईल, अशी ग्वाही सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी  रविभवनात पार पडलेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत दिली. कुण्या व्यक्‍तीला दलित या शब्दाने उच्चारले असता त्यामुळे भावना दुखावतात. तसेच हा शब्द असंवैधानिक आणि आक्षेपार्ह आहे. यामुळे मुद्रित, दृक्श्राव्य तसेच सोशल नेटवर्किंग साईट्सवर हा शब्द वापरण्यात येऊ नये, अशी विनंती करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल आहे. या प्रकरणी राज्य सरकारने सामाजिक न्याय व विशेष सहायक विभागाचे पत्र सादर करत दलित हा शब्द वगळण्यास सकारात्मकता दर्शविली. तसेच याबाबत निर्णय घेण्यासाठी बैठक आयोजित करण्याचे प्रस्तावित असल्याचे सांगितले. यावर न्यायालयाने  नागपुरात उच्चस्तरीय बैठक घेण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार रविभवनात सामाजिक न्याय विभागाची उच्चस्तरीय बैठक आयोजिण्यात आली होती. या बैठकीमध्ये सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले व याचिकाकर्ते पंकज मेश्राम यांच्यातर्फे अ‍ॅड. शैलेश नारनवरे उपस्थित होते.