Tue, Jun 15, 2021 13:28
२०२४ मध्ये काँग्रेस राज्यात सर्वात मोठा पक्ष : नाना पटोले

Last Updated: Jun 11 2021 7:55PM

अकोला: पुढारी वृत्तसेवा ;  नाना पटोले यांनी काँग्रेस २०२४ मध्ये राज्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येईल असे वक्तव्य केले. ते आज ( दि. ११ ) अकोल्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. 'प्रदेशाध्यक्षपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर जिल्हास्तरावर संघटनात्मक बदल करीत आहोत. पक्षांतर्गत समन्वयावर भर देऊन काँग्रेसचा जनाधार वाढवण्यावर भर देऊ. तसेच २०२४ मध्ये काँग्रेस राज्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून उभा राहील.' असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला. शुक्रवारी दुपारी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

अधिक वाचा : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी नागपूर दौऱ्यावर

यावेळी त्यांनी भाजपवर कडाडून टिका केली. उद्योगपती धार्जिणे केंद्रातील मोदी सरकार एकेक निर्णयातून शेतकऱ्यांना मरण यातना देत आहे. नुकतेच जाहीर केलेले शेतमालावरील समर्थनमूल्य शेतकरी हिताचे नसल्याने त्याचा निषेध करत असल्याचे नाना पाटोले म्हणाले. 

अधिक वाचा : 'उद्धव ठाकरे अजून एक वर्ष सीएम, नंतर अडीच वर्षे फडणवीस मुख्यमंत्री होऊ देत' 

 

पेट्रोल, डिझेल, खत, मजुरांचे दर वाढत असताना शेतकऱ्यांना कमी भाव मिळावा ही खेळी केंद्राने खेळल्याचा आरोप केला. यावेळी महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर, आ. कुणाल पाटील, प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे, प्रदेश प्रवक्ता अतुल लोंढे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल, महानगर अध्यक्ष बबनराव चौधरी, माजी मंत्री प्रा.अझहर हुसेन आदी उपस्थित होते.

 

अधिक वाचा : चेल्लम सरांनी दिली मुंबई पोलिसांना टीप

भाजपने ओबीसी आरक्षण संपवले 

ओबीसी आरक्षण संपवण्यात भाजप यशस्वी झाल्याचा आरोप करुन नाना पटोले यांनी नागपूर जिल्हा परिषदेत फडणवीस यांच्या कार्यकाळात झालेला घटनाक्रम सांगितला. आपली सत्ता जाऊ नये म्हणून फडणवीस शासनाने सत्तेचा गैरवापर केला. परंतु निवडणूक झाल्यानंतर काँग्रेसची सत्ता आली. जे भाजपला होऊ द्यायचे नव्हते असेही पटोले म्हणाले.

कोविड स्थिती हाताळण्यात केंद्र शासन अपयशी

कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर दुस-या लाटेविषयी केंद्र शासन गाफील राहिले. त्याचा फटका देशवासियांना बसला. अनेकांचे प्राण गेले. ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शनची व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात मोदी सरकार अपयशी ठरले. 300 कोटी लसींची आवश्यकता असताना तेवढ्या लसी उपलब्ध करुन देण्याऐवजी केंद्राने पाकिस्तानला लसी पाठवल्या. आता विदेशातून लसी मागवण्याची वेळ आपल्यावर आली आहे. योग्य नियोजन राहिले असते तर गोंधळ उडाला नसता तसेच लोकांचे जीव गेले नसते असे नाना पटोले म्हणाले. जागतिक प्रचारक असणा-या मोदींकडून देशातील जनतेचा अंत पाहिला जात आहे, असा आरोपही त्यांनी केला.