Tue, Jul 07, 2020 17:32होमपेज › Vidarbha › महापोर्टल तत्काळ बंद करा : रोहित पवार

महापोर्टल तत्काळ बंद करा : रोहित पवार

Last Updated: Dec 21 2019 11:31PM
नागपूर : विशेष प्रतिनिधी

राज्य सरकारने महापरीक्षा महापोर्टला स्थगिती दिली असली तरी हे महापोर्टल तत्काळ बंद करावे आणि सरकारी पदाच्या परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात याव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी शनिवारी विधानसभेत औचित्याच्या मुद्याद्वारे केली.

सरकारने महापोर्टलसाठी ज्या कंपनीला कंत्राट दिले त्याचा शासन आदेश आणि निविदेत मोठी तफावत आहे. महापोर्टलने घेतलेल्या परिक्षेदरम्यानची सीसीटीव्ही फुटेज मिळत नाही. वनविभागाच्या परीक्षेत शारीरिक क्षमता न तपासता केवळ लेखी परीक्षेद्वारे उमेदवारांची निवड करण्यात आली. महापोर्टलचा कारभार योग्य रितीने सुरु नाही. त्यामुळे ते बंद करावे आणि मुख्यमंत्र्यांनी याविषयी बैठक बोलवावी, अशी मागणी रोहित पवार यांनी केली.