Wed, Jul 08, 2020 10:12होमपेज › Vidarbha › साहित्य संमेलनाला मुख्यमंत्र्यांची अनुपस्थिती

साहित्य संमेलनाला मुख्यमंत्र्यांची अनुपस्थिती

Published On: Jan 10 2019 2:02AM | Last Updated: Jan 10 2019 1:53AM
नागपूर : प्रतिनिधी

वादाच्या भोवर्‍यात सापडलेल्या  92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अनुपस्थित राहण्याची शक्यता आहे. दिल्ली येथे भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आणि संमेलनाचे उद्घाटन एकाच दिवशी असल्याने आयोजकांची चिंता वाढली आहे. ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द केल्यानंतर संमेलनाध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उद्घाटन सोहळ्यातील भाषणांकडे सार्‍यांचे लक्ष लागले होते.