Sun, Jul 05, 2020 16:30होमपेज › Vidarbha › चंद्रपूर : ताडोबात विजेच्या धक्‍क्याने वाघाचा मृत्यू

चंद्रपूर : ताडोबात विजेच्या धक्‍क्याने वाघाचा मृत्यू

Published On: Dec 09 2018 9:15AM | Last Updated: Dec 09 2018 9:19AM
चंद्रपूर : प्रतिनिधी 

ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील पट्टेदार वाघाचा विजेचा धक्‍का बसून मृत्यू झाला आहे. दोन वर्षे वयाचा हा वाघ तारा नावाच्या वाघिणीचा बछडा होता. 

ताडोबालगत असलेल्या भामडेळी येथील एका शेतात वीजप्रवाह सोडलेला होता. पिकांचं वन्यजीवांपासून संरक्षण करण्यासाठी हा वीजप्रवाह सोडला जातो. त्यात हा वाघ अडकून मृत्युमुखी पडला. या वाघाला कॉलर आयडी बांधलेला होता. पण, तरीही त्यावर पाळत ठेवणं वनविभागाला शक्य झालं नाही. त्यामुळे पुन्हा वाघाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.