Sat, Jul 04, 2020 02:21होमपेज › Vidarbha › महाराष्ट्रात ब्रह्मपुरी सर्वात हॉट ऽ ४५.१

महाराष्ट्रात ब्रह्मपुरी सर्वात हॉट ऽ ४५.१

Published On: Apr 24 2019 1:42AM | Last Updated: Apr 24 2019 1:10AM
नागपूर : प्रतिनिधी

गेल्या आठवड्यात अवकाळी पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्यामुळे नागपूरसह विदर्भातील जनतेला थोडा दिलासा मिळाला होता. सोमवारपासून सूर्य आग ओकू लागल्याने विदर्भात उष्णतेची लाट आली आहे. मंगळवारी ब्रह्मपुरी येथे 45.1 अंश सेल्सिअस एवढ्या सर्वाधिक तापमानाची नोंद घेण्यात आली आहे. विदर्भात पारा 40 च्या वर गेल्यामुळे पुन्हा उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

आज सर्वाधिक तापमानाची नोंद ब्रह्मपुरी येथे 45.1 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आली. त्या खालोखाल वर्धा 43.8, चंद्रपूर 43.4, अकोला 43.4, नागपूर 42.5, अमरावती 42.6, गडचिरोली 42.2, गोंदिया 41, वाशिम 41.2, यवतमाळ 42.2, बुलडाणा 40.6, 45.1 अंश सेल्सिअस अशी नोंद करण्यात आली आहे.