Wed, Jan 27, 2021 08:36होमपेज › Vidarbha › ‘भाजप, सेनेचे मंत्री एकत्र शपथ घेतील’

‘भाजप, सेनेचे मंत्री एकत्र शपथ घेतील’

Published On: Feb 16 2018 7:31AM | Last Updated: Feb 16 2018 7:31AMनागपूर : प्रतिनिधी

विधानसभेच्या आगामी निवडणुकीनंतर भाजप आणि शिवसेनेचे मंत्री 31 ऑक्टोबर 2019 ला एकत्र शपथ घेतील, असे राज्याचे वित्त व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

विभागीय आयुक्‍त कार्यालयात जिल्हा वार्षिक सर्वसाधारण नियोजनाच्या प्रारूप आराखड्याला अंतिम मंजुरी देण्यासाठी राज्यस्तरीय बैठक झाली. या बैठकीनंतर ते प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. सरकारमध्ये सहभागी शिवसेनेतर्फे शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यापासून सरकारची विरोधकांप्रमाणे कोंडी केली जात आहे. या पार्श्‍वभूमीवर उभय पक्षांमध्ये समेट घडण्याची काही चिन्हे आहेत का, असा प्रश्‍न केला असता त्यांनी, विधानसभेच्या आगामी निवडणुकीनंतर भाजप आणि शिवसेनेचे मंत्री एकत्र शपथ घेतील, असे विधान केले. सत्तेत सहभागी पक्षाने सरकारकडे मागणी करणे याचाअर्थ राजकारण होय, असा नसून शेतकर्‍यांनी वेगाने मदत मिळावी, हा त्यामागील हेतू आहे. गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना मदत देणे सरकारचे कर्तव्य आहे.