Wed, Dec 11, 2019 18:50होमपेज › Vidarbha › एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅलीचे आयोजन (video)

एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅलीचे आयोजन (video)

Last Updated: Dec 03 2019 12:54PM

एड्सची जनजागृती करताना विद्यार्थीवाशिम : प्रतिनिधी 

एड्स या रोगाविषयी सामान्य नागरिकांत जनजागृती व्हावी या उदात्त हेतूने जागतिक एड्स दिन साजरा करण्यात आला. या निमित्त्याने जिल्हा सामान्य रुग्णालय वाशिम आणि शहरातील विविध नर्सिंग कॉलेजच्या संयुक्त विद्यमाने शहरात रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी कॉलेजच्या विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनीनी शहरातील प्रत्येक चौका-चौकात पथनाट्य सादर करून वाशिम शहरात एड्स विषयी जनजागृती केली. या कार्यक्रमात मोठया संख्येने विद्यार्थीनी सहभाग घेतला होता.