नागपूर ः प्रतिनिधी
एकतर्फी प्रेमातून नववीत शिकणार्या मुलीवर उकळते तेल फेकण्याची गंभीर घटना अमरावतीत घडली असून पोलिसांनी तीन तरुणांना अटक केली आहे. ही घटना घडल्यानंतर संबंधीत मुलीवर अॅसिड फेकल्याची चर्चा सुरू होती, मात्र आरोपींनी ते उकळते तेल असल्याची व एकतर्फी प्रेमातून ही घटना घडल्याची कबुली दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
मंगळवारी संध्याकाळी सहाच्या दरम्यान अमरावतीतील मालटेकडी भागात हा प्रकार घडला होता. संबंधित विद्यार्थिनी अमरावतीतील गर्ल्स हायस्कूलमध्ये इयत्ता नववीत शिकते. मंगळवारी संध्याकाळी सहाच्या सुारास दोघांनी तिला गाठून तिच्यावर उकळते तेल फेकले. यावेळी तिच्यासोबतच्या मैत्रिणीने आरडाओरड केल्याने आजूबाजूचे नागरिक त्यांच्या मदतीसाठी धावून आले. त्यांनी या मुलीला त्वरीत हॉस्पिटलमध्ये नेले. या हल्ल्यात सदर मुलगी 12 टक्के भाजली असून तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.