Wed, Jul 08, 2020 17:01होमपेज › Vidarbha › गांधी विचार परीक्षेत ‘अरुण गवळी’ टॉपर

गांधी विचार परीक्षेत ‘अरुण गवळी’ टॉपर

Published On: Aug 13 2018 12:14PM | Last Updated: Aug 13 2018 12:14PMनागपूर : पुढारी ऑनलाईन 

अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी यांच्यावर गांधी विचारांचा प्रभाव पडेल असा विचारही कोण करणार नाही. मात्र, त्‍यांच्यावर महात्‍मा गांधी यांच्या विचारांचा प्रभाव पडला आहे. नागपूर कारागृहात नुकतीच महात्‍मा गांधी यांच्या विचारावर एक परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत अरूण गवळी यांनी पहिला क्रमांक पटकाविला आहे.

गुन्हेगारांनी केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगण्यासाठी त्यांना कारागृहात पाठविण्यात येते. शिक्षा भोगत असातना त्‍यांच्यात परिवर्तन होण्यासाठी त्‍यांना विचारवंतांची पुस्‍तके वाचायला दिली जातात. दर वर्षी या पुस्‍तकांवर परीक्षा घेतली जाते आणि त्‍यामधून नंबर काढले जातात. नागपूर कारागृहामध्येही अशी परीक्षा घेतली जाते.  या कारागृहातील कैद्यांना महात्‍मा गांधींच्या विचारांची पुस्‍तके वाचायला दिली होती आणि त्‍यावर परीक्षा घेण्यात आली. यामध्ये १६० कैद्यांनी सहभाग घेतला होता, अरुण गवळी यांनीही ही परीक्षा दिली. ८० गुणांच्या या परीक्षेत ७४ गुण मिळवत अरुण गवळी यांनी पहिला नंबद मिळविला.  

अरुण गवळी हे महात्‍मा गांधी यांच्या विचारांवर घेण्यात आलेल्‍या परीक्षेत पहिले आले असले तरी, आता त्‍यांच्या खऱ्या आयुष्‍यावर गांधी विचारांचा प्रभाव पडणार का हे महत्‍वाचे आहे.