Sat, May 30, 2020 13:59होमपेज › Vidarbha › नागपुरात कोरोनाचे आणखी दोन रूग्ण पॉझिटिव्ह

नागपुरात कोरोनाचे आणखी दोन रूग्ण पॉझिटिव्ह

Last Updated: Mar 28 2020 5:41PM

file photoनागपूर : विशेष प्रतिनिधी

नागपुरातील कोरोनाबाधित रूग्णांच्या संखेत आज शनिवारी तिसर्‍या दिवशी दोनने वाढ झाली आहे. शनिवारी सकाळी आणखी दोन रूग्णाचा स्वॅब चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे नागपुरातील कोरोनाबाधित रूग्णांची संख्या आता ११ एवढी झाली आहे.

१८ मार्चला दिल्लीहून परतलेल्या एका व्यक्तीचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह निघाला होता. याच रूग्णाच्या संपर्कात आलेल्या त्यांच्या परिवारातील आणखी चार व्यक्ती शुक्रवारी पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. तर नव्याने आढळलेल्या दोन पैकी एक पॉझिटिव्ह रूग्ण सुध्दा दिल्लीहून परतलेल्या रूग्णाच्या संपर्कात आलेला असल्याची माहिती वैद्यकिय सुत्रांनी दिली आहे. 

तब्बल १२ दिवसांनंतर नागपुरातील कोरोनाबाधित रूग्णाच्या संख्येत गुरूवारी एकने वाढ झाली होती. त्यानंतर मात्र आता एका पाठोपाठ एक एक असे आणखी सात रूग्ण वाढले आहे. गुरूवारनंतर आढळलेले पाच नवे रूग्ण दिल्लीहून परतलेल्या रूग्णाच्या संपर्कात आल्याने संक्रमित झाले आहे. नागपुरातील कोरोनाबाधित रूग्णांची संख्या आता ११ एवढी झाली आहे. नागपुरात शनिवारी दिवसभरात ६२ संशयीत रूग्ण आढळून आले असून एकूण संशयितांचा संख्या ५९६ एवढी झाली आहे. आता पर्यत एकूण भरती केलेल्या व्यक्तीची संख्या ३५८ आहे. आज ६२ तपासणी नमुने घेण्यात आले. आतापर्यत एकूण तपासणी केलेले नमुने ३८६ असून त्यापैकी ११ नमुने पॉझिटिव्ह आढळले आहेत. मागील पंधरा दिवसात १०१२ व्यक्तींना त्यांच्या घरीच विलगीकरण करून देखरेखीखाली ठेवले आहे. तर, १२४ व्यक्ती अद्यापही रूग्णालयाच्या विलगीकरण कक्षात आहे. शुक्रवारी १७ व्यक्तींना विलगीकरण कक्षातून घरी जाण्याची सुटी देण्यात आली. सध्या नागपुरातील वैद्यकीय महाविद्यालयात २९ आणि मेयो रूग्णालयात ४३ असे ७२ संशयीत रूग्ण भरती आहेत. 

१४ दिवस पाठपुरावा केलेल्या व्यक्तींची संख्या ४९ असून विमानतळावर आतापर्यत ११२३ व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे.