Sat, Jul 11, 2020 10:42होमपेज › Vidarbha › दारू न मिळाल्याने पिले सॅनिटायझर, पालिकेच्या कर्मचार्‍याचा मृत्यू

दारू न मिळाल्याने पिले सॅनिटायझर, पालिकेच्या कर्मचार्‍याचा मृत्यू

Last Updated: Jun 30 2020 6:01PM
नागपूर : पुढारी वृत्तसेवा 

दारू ऐवजी चक्क सॅनिटायझरचे सेवन केल्याने नागपुरातील एका व्यक्तीला आपले प्राण गमवावे लागले आहेत. सॅनिटायझर पिल्याने या व्यक्तीचा मंगळवारी (दि ३०) नागपुरात मृत्यू झाला आहे. नागपुरातील गंगाबाई घाट परिसरातील गुजरनगर भागात ही घटना घडली. 

अधिक वाचा : वाशिम : 'बेरोजगारांसाठी मार्गदर्शन, समुपदेशन कक्ष'

दारू मिळाली नाही म्हणून या व्यक्तीने सॅनिटायझर पिले होते. त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडून उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. गौतम बिसेन गोस्वामी (वय ४५) असे मृताचे नाव आहे. सॅनिटायझर प्यायल्याने मृत्यूमुखी पडलेली व्यक्ती ही महापालिकेच्या स्वच्छता विभागात कार्यरत होती. या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौतम हे महापालिकेत स्वच्छता कर्मचारी म्हणून कार्यरत होते. त्यांना दारूचे व्यसन होते. २१ जून रोजी दारू न मिळाल्याने ते सॅनिटायझर प्यायले. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली. नातेवाइकांनी त्यांना मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल केले. उपचारादरम्यान त्यांचा मंगळवारी मृत्यू झाला. 

अधिक वाचा : वाशिम : विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद दाखल केली आहे. नागपुरात घडलेल्या या घटनेमुळे जिल्हा प्रशासन चांगलंच हादरले आहेत. सॅनिटायझर प्यायल्याने मृत्यू झाल्याची ही नागपुरातील पहिलीच घटना आहे.

अधिक वाचा : 'लॉकडाऊन'वरून फडणवीसांचा मुख्यमंत्री ठाकरेंवर निशाणा