Sun, Jul 05, 2020 06:34होमपेज › Vidarbha › नागपूर : दोन गाड्यात सापडलेले ८० लाख कुणाचे ?

नागपूर : दोन गाड्यात सापडलेले ८० लाख कुणाचे ?

Published On: Mar 15 2019 10:52PM | Last Updated: Mar 15 2019 10:52PM
नागपूर : प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरात आचारसहिंता लागली आहे. नागपूरमध्येही राजकारण रंग घेत असतानाच सावनेर परिसरात दोन वाहनांमध्ये ८० लाख रुपयांची रोख रोकड सापडल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. शक्रवारी दुपारी २.३० वाजता केवळद चेक पोस्टवरही तपासणी पथकाला ही रक्कम सापडली. 

केवळद चेकपोस्टवर तपासणी पथकाला एका कारमध्ये ३० लाख रुपये आढळले. ही कार पलाश माहेश्वरी चालवत होते. त्या पाठोपाठच्या दुस-या वाहनाची तपासणी केली असता या वाहनातही रोख ५० लाख रुपये सापडले. हे वाहन कैलाश सुद हे चालवत होते. या रकमेसंदर्भात वाहनचालकांना विचारले असता ते योग्य स्पष्टीकरण देऊ शकले नाहीत. त्यामुळे सावनेर पोलिसांनी वाहने व रोख रु ८० लाखाची रकम ताब्यात घेउन सावनेर उप कोषागारात जमा केली आणि या प्रकरणी गुन्हा दाखल केला. 

या प्रकरणी सावनेर पोलिसांनी निवडणूक अधिकारी आणि आयकर विभागाला कळविल्याचे पोलिसांनी सांगितले. सदर प्रकरणी पोलिस कारचालकांची कसून चौकशी करीत आहेत. अद्याप ही रक्कम नेमकी कोणाची हे आणि कशासाठी घेऊन जात होते, हे समजू शकले नाही.