Wed, May 27, 2020 02:40होमपेज › Vidarbha › चंद्रपूर : देवदर्शनाहून परतताना काळाचा घाला; अपघातात ६ जण जागीच ठार

चंद्रपूर : देवदर्शनाहून परतताना काळाचा घाला; अपघातात ६ जण जागीच ठार

Last Updated: Feb 21 2020 1:16AM
चंद्रपूर : पुढारी ऑनलाईन

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील केसलाघाट येथे ट्रक आणि स्कॉर्पिओ गाडी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात ६ जण जागीच ठार झाले आहेत. तर ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमधील सर्वजण चंद्रपूरमधील आहेत. ते गोंदिया येथून देशदर्शनाहून परतत असताना हा भीषण अपघात झाला. केसलाघाट गावात मध्यरात्री उशिरा हा अपघात झाला.

अधिक मिळालेल्या माहितीनुसार, केसलाघाट येथे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला स्कॉर्पिओ गाडीने धडक दिली. यामुळे स्कॉर्पिओचा काही भाग ट्रकमध्ये घुसला. यात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन महिला, दोन पुरुष आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. मृतांमधील सर्वजण चंद्रपूरमधील भोयर व पाटील कुटुंबातील सदस्य असल्याचे समजते. अपघातातील जखमींना तातडीने मूल येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक लोकांनी जखमींना वाचवण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी मूल पोलिस अधिक तपास करत आहेत.