नागपूर : पुढारी वृत्तसेवा
वर्धा जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आकडा सातत्याने वाढत आहे. आज मंगळवारी (दि. १४ जुलै) नव्याने ५ रुग्णांची नोंद झाली आहे. आर्वी येथील रुग्णाच्या निकट संपर्कातील हे रुग्ण आहेत. १२ जुलैला निदान झालेल्या आर्वी येथील रामदेव बाबा वार्डमधील कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेले दोन पुरूष तर दोन महिला तसेच एक २० वर्षांचा मुलगा कोरोना बाधित असल्याचे आज निदान झाले.
त्यांचे नमुने १२ जुलै रोजी रात्री पाठविण्यात आले होते. त्यांचे अहवाल आज प्राप्त झाले. या रुग्णांना सावंगी येथे कोरोना उपचारासाठी भरती करण्यात येणार आहे.