Sat, Oct 24, 2020 09:13होमपेज › Vidarbha › गडचिरोलीत कोसमी-किसनेली जंगल परिसरात ५ नक्षलवाद्यांना कंठस्नान

गडचिरोलीत कोसमी-किसनेली जंगल परिसरात ५ नक्षलवाद्यांना कंठस्नान

Last Updated: Oct 23 2020 1:24AM

संग्रहीत छायाचित्रनागपूर : पुढारी वृत्तसेवा 

गडचिरोली जिल्ह्यातील उपविभाग धानोरा अंतर्गत येणाऱ्या पोलिस मदत केंद्र ग्यारापती हद्दीतील कोसमी-किसनेली जंगल परिसरात पाच नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश आले आहे. 

रविवार (दि.१८) दुपारी ४ च्या सुमारास ही घटना घडली आहे. पोलिस अधीक्षक अंकित यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया व पोलिस उपअधीक्षक भाऊसाहेब ढोले यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. सी ६० चे कमांडो नक्षलविरोधी अभियान राबवित असताना नक्षलवाद्यांनी जवानांवर हल्ला केला. प्रत्युत्तरादाखल सी ६० जवानांनी नक्षलवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला. यामध्ये ५ नक्षलवाद्यांना ठार करण्यात सी ६० जवानांना यश आले. घटनास्थळी नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्यात आले आहे.

वाचा : राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांना तीन महिन्यांची शिक्षा

वाचा :नागपूर : १६ खासगी रुग्णालयांना दणका

 "