Wed, Apr 01, 2020 07:41होमपेज › Vidarbha › नागपूर : मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून चार महिलांचा मृत्यू

नागपूर : मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून चार महिलांचा मृत्यू

Last Updated: Feb 26 2020 1:08AM
नागपूर : पुढारी ऑनलाईन 

नागपूरमधील अदासा येथे लघु पाटबंधारे विभागाच्या बंधाऱ्याचं बांधकाम सुरु असताना काल (ता.२१) मोठी दुर्घटना घडली. चार महिला मजुरांचा मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला. या घटनेत दोन अन्य महिला जखमी झाल्या आहेत. पोलिसांनी या प्रकरणात कंत्राटदार आणि कामावरील सुपरवायझरविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

अदासा येथे पाटबंधारे विभागाच्या छोट्या बंधाऱ्याचं काम सुरु आहे. त्या ठिकाणीच एक मातीचा ढिगाराही होता. यावेळी हा ढिगारा कोसळून सहा महिला मजूर दबल्या गेल्या. यापैकी दोन महिलांना वाजवण्यात यश आले. मात्र इतर चार महिलांचा दुर्देवी मृत्यू झाला. सर्व मृत महिला मध्य प्रदेशमधील रहिवासी आहेत.