Sat, Oct 24, 2020 22:40



होमपेज › Vidarbha › बुलढाण्यात आज ३८ पॉझिटिव्ह 

बुलढाण्यात आज ३८ पॉझिटिव्ह 

Last Updated: Aug 13 2020 7:16PM




बुलढाणा : पुढारी वृत्तसेवा 

जिल्ह्यात आज (गुरुवार) प्रयोगशाळेतून 29 व रॅपीड अॅन्टीजेंन किटच्या माध्यमातून करण्यात आलेल्‍या टेस्‍टमधून 9 असे एकूण 38 जण कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा आता 2066 वर गेला आहे. 

आज 2 रूग्णांनी कोरोनावर मात केली असून, आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या 1234 जणांना रूग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. जिल्ह्यातील  मृत रूग्णांची संख्या  36  आहे. सद्या कोविड रूग्णालयात  795 रूग्ण उपचार घेत आहेत. कोरोना संशयित 126 रूग्णांच्या स्वॅबचे अहवाल प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हावयाचे आहेत. अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली.





 







"