Sat, Apr 10, 2021 19:57
गडचिरोली: कोरोनामुळे दोघांचा मृत्यू, २१९ नवे बाधित

Last Updated: Apr 08 2021 5:54PM

गडचिरोली : पुढारी वृत्तसेवा

आज भामरागड येथील ७३ वर्षीय महिला व गडचिरोली येथील ५३ वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. जिल्ह्यात २१९ नवीन बाधित आढळून आले असून ३७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनामुक्त रुग्णांणा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत ११ हजार ६०२ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यातील १२४ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १० हजार ४४२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या १ हजाअर ३६ कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आज जिल्ह्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९० टक्के, तर मृत्यू दर १.०७ टक्क्यांपर्यंत पोहचला आहे.