वाशिम जिल्ह्यात नवे २० रुग्ण आढळले

Last Updated: Jul 09 2020 7:54PM
Responsive image


वाशिम : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात नवे २० व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. यामध्ये वाशिम तालुक्यातील १५, मंगरूळपीर शहरातील ०३, मालेगाव येथील ०१ व रिसोड तालुक्यातील ०१ व्यक्तीचा समावेश आहे.

अधिक वाचा : वाशिम : सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत दुकाने सुरु ठेवण्यास मुभा

वाशिम शहरातील माधवनगर परिसरातील एकाच कुटुंबातील ३४ वर्षीय पुरुष व २७ वर्षीय महिला, ध्रुव चौक परिसरातील ३५ वर्षीय पुरुष, कसाबपुरा परिसरातील ४५ वर्षीय पुरुष, हकीमअली नगर परिसरातील ३८ वर्षीय व्यक्ती,  हिवरा रोहिला (ता. वाशिम) येथील एकाच कुटुंबातील ४९ वर्षीय पुरुष व ४२ वर्षीय महिला, तोरणाळा (ता. वाशिम) येथील २९ वर्षीय पुरुषाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तसेच वाशिम शहरातील गंगू प्लॉट परिसरातील ४० व ३४ वर्षीय महिला, १४ वर्षीय मुलगी, १६ व १७ वर्षीय युवक, ३० वर्षीय पुरुष, बिलाला नगर येथील १२ वर्षीय मुलगा कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.

अधिक वाचा : अकोला : जिल्हा उपनिबंधक आणि सहायक विक्रीकर आयुक्त लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

मालेगाव शहरातील अकोला फाटा येथील ३६ वर्षीय व्यक्ती, मंगरूळपीर शहरातील हडको कॉलनी परिसरातील २५ वर्षीय महिला, बिलाला नगर परिसरातील ४५ वर्षीय महिला, ३७ वर्षीय पुरुष, आंचळ (ता. रिसोड) येथील ४४ महिलेला सुद्धा कोरोना विषाणू संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

अधिक वाचा : गडचिरोली : सीआरपीएफच्या ११ जवानांसह १४ बाधित