Tue, Jul 07, 2020 06:00होमपेज › Vidarbha › नागपुरात एकाच दिवशी ५६ पॉझिटिव्ह 

नागपुरात एकाच दिवशी ५६ पॉझिटिव्ह 

Last Updated: Jun 05 2020 5:31PM
नागपूर : पुढारी वृत्तसेवा

विदर्भातील नागपुरात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या शुक्रवारी ५६ ने वाढली. नागपुरातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात भरती असलेल्या ५६ संशयीत रूग्णांचे कोरोना चाचणी अहवाल शुक्रवारी (दि ५ जुन) पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरातही आता कोरोनाबाधित रूग्णांची संख्या ६८० झाली आहे. 

अधिक वाचा : अकोल्यात नव्या १४ कोरोना रुग्णांची वाढ 

नवीन रूग्णांसह आतापर्यत नागपुरातील रूग्ण संख्या ७०० च्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. कोरोनामुळे नागपुरात आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४१३ कोरोनाबाधित रूग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत नागपुरात २०४ अॅक्टीव्ह रूग्ण वैद्यकिय महाविद्यालय आणि मेयो हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. नागपुरातील बजाजनगर, लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमान नगर, धंतोली, नेहरूनगर, गांधीबाग, सतरंजीपुरा, मोमीनपुरा, लकडगंज, आसीनगर, मंगळवारी या भागात कोरोनाचे हे रूग्ण वाढले आहे.

अधिक वाचा : बुलडाण्यात मुंद्राक जादा दराने विक्री करणाऱ्याला झटका!