Thu, Jun 24, 2021 12:13
युवराज सिंगचा कर्णधारपदाबाबत मोठा खुलासा

Last Updated: Jun 10 2021 4:35PM

पुढारी ऑनलाईन डेस्क : युवराज सिंगने कर्णधारपदाबाबत मोठा खुलासा केला आहे. त्याने एका पॉडकास्ट दरम्यान हा खुलासा केला. युवराजला २००७ च्या टी - २० वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाचे कर्णधारपद मिळेल अशी अपेक्षा होती. युवराजने स्वतःच याबाबत खुलासा केला आहे. 

टीम इंडियाच्या श्रीलंका दौऱ्याची तारीख ठरली 

युवराज सिंग हा भारताचा अव्वल दर्जाचा मॅच विनर खेळाडू होता. त्याने आपल्या धडाकेबाज खेळीने आणि उपयुक्त फिरकीने अनेक सामने जिंकून दिले आहेत. युवराज हा भारताचा एक महान खेळाडू म्हणून गणला जातो. पण, त्याला कधीही संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली नाही. तो २००७ च्या टी - २० वर्ल्डकपमध्ये संघाचा कर्णधार होईल अशी अनेक चाहत्यांना अपेक्षा होती पण, संघाची धुरा धोनीकडे देण्यात आली. 

याबाबत युवराजने क्रिकेट प्रेझेंटर गौरव कपूर याच्या २२ यार्ड ( 22 Yarns )  या पॉडकास्टमध्ये याबाबत खुलासा केला. युवराज म्हणाला  'आम्ही एकदिवसीय वर्ल्डकप हारलो होतो. भारतीय क्रिकेट वर्तुळात वातावारण तापले होते. त्यानंतर दोन महिन्याचा इंग्लंड दौरा होता. त्यानंतर दक्षिण आफ्रिका आणि आयरलँडचा एक महिन्याचा दौरा. परत टी - २० वर्ल्डकपसाठी एक महिना असे चार महिने आम्ही घरापासून दूर राहणार होतो.'  

टीम इंडिया बायो बबलमधून बाहेर पडणार 

युवराज पुढे म्हणाला 'बहुदा वरिष्ठ खेळाडूंना काही काळ ब्रेक हवा होता. सहाजीकच होते की टी - २० वर्ल्डकप कोणी गांभीर्यांने घेतला नव्हता. मला अपेक्षा होती की मी टी - २० वर्ल्डकपसाठी भारताचा कर्णधार होईन. पण, महेंद्रसिंह धोनीचे नाव संघाचा कर्णधार म्हणून जाहीर झाले.'  

त्यानंतर युवराजला कर्णधारपदाचे प्रकरणाने धोनी आणि तुझ्या नात्यावर परिणाम झाला का असे विचारण्यात आले. त्यावेळी युवराजने 'सहाजीकच आहे की कोणीही कर्णधार होऊ दे त्याला तुम्ही सपोर्ट करायलाच हवा. मग तो राहुल द्रविड असो, सौरभ गांगुली असो किंवा भविष्यात कोणीही असो. शेवटी तुम्ही एक संघसहकारी असता. मी देखील होतो.'

वंशवादी ट्विट : रॉबिन्सननंतर अँडरसनचा नंबर? 

युवराज सिंगने २००७ च्या टी - २० वर्ल्डकपमध्ये धडाकेबाज कामगिरी करत भारताच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. यानंतर युवराज २०११ च्या एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली खेळला. यावेळीही त्याने संघासाठी आपले सर्वस्व दिले.