Sun, Jan 24, 2021 20:10कोहली, अश्‍विन यांना मानांकन

Last Updated: Nov 26 2020 1:26AM
नवी दिल्‍ली : वृत्तसंस्था

भारताचा कर्णधार विराट कोहली आणि फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्‍विन यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या वतीने देण्यात येणार्‍या दशकातील सर्वश्रेष्ठ खेळाडू (प्लेअर ऑफ द डीकेड) पुरस्कारासाठी मानांकन मिळाले आहे. विराटला या पुरस्कारासह इतर सर्व म्हणजेच पाचही प्रकारामध्ये मानांकन मिळाले आहे. तर, भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीसह सलामीवीर रोहित शर्मा याला वन-डेतील ‘प्लेअर ऑफ द डीकेड’ पुरस्कारासाठी मानांकन मिळाले आहे. रोहितला टी-20 साठीही मानांकन मिळाले आहे. याशिवाय मिताली राज आणि झुलन गोस्वामी यांनाही महिला गटातून काही प्रकारात मानांकन मिळाले आहे.

आयसीसीने मंगळवारी सात खेळाडूंची नावे जाहीर केली. कोहली, अश्‍विनशिवाय इंग्लंडचा जो रूट, न्यूझीलंडचा केन विल्यम्सन, ऑस्ट्रेलियाचा स्टिव्ह स्मिथ, दक्षिण आफ्रिकेचा ए. बी. डिव्हिलीयर्स आणि श्रीलंकेचा कुमार संगकारा यांनाही मानांकन मिळाले आहे. 

मानांकन यादी

दशकातील सर्वोत्तम वन-डे खेळाडू :

विराट कोहली, रोहित शर्मा, महेंद्रसिंग धोनी, लसिथ मलिंगा, मिचेल स्टार्क, ए. बी. डिव्हिलीयर्स, कुमार संगकारा.

दशकातील सर्वोत्तम कसोटी खेळाडू :
 

विराट कोहली, जो रूट, केन विल्यम्सन, स्टिव्ह स्मिथ, जेम्स अँडरसन, रंगना हेराथ, यासिर शाह.

दशकातील सर्वोत्तम टी-20 खेळाडू :

रोहित शर्मा, राशीद खान, विराट कोहली, इम्रान ताहिर, अ‍ॅरोन फिंच, लसिथ मलिंगा, ख्रिस गेल.

दशकातील सर्वोत्तम महिला खेळाडू : एलिस पेरी, मेग लॅनिंग, सुझी बेटस्, स्टेफनी टेलर, मिताली राज, सारा टेलर.

दशकातील सर्वोत्तम टी-20 महिला खेळाडू: मेग लॅनिंग, सोफी डिव्हाईन, एलिस पेरी, डिआंड्रा डॉटिन, एलिसा हेली, अन्य श्रबसोल.

दशकातील सर्वोत्तम वन-डे महिला खेळाडू : मेग लॅनिंग, एलिस पेरी, मिताली राज, सुझी बेटस्, स्टेफनी टेलर, झुलन गोस्वामी.

दशकातील खेळभावनेचा पुरस्कार : विराट कोहली, केन विल्यम्सन, ब्रेंडन मॅक्युलम, मिसबाह-उल-हक, महेंद्रसिंग धोनी, अन्या श्रबसोल, कॅथरिन बर्न्ट, महेला जयवर्धने, डॅनियल व्हिटोरी.
आयसीसीच्या संकेतस्थळावर सर्व प्रकारातील खेळाडूंना मत देण्याची सुविधा चाहत्यांना उपलब्ध असून, सर्वाधिक मते मिळणार्‍या खेळाडूला पुरस्कार दिला जाणार आहे.