Wed, Aug 12, 2020 20:54होमपेज › Sports › डोक्‍यावर कोरलेला विराट व्हायरल; पाहिला का?

डोक्‍यावर कोरलेला विराट व्हायरल; पाहिला का?

Last Updated: Jan 15 2020 6:41PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली हा त्‍याच्या मैदानातील दमदार खेळासाठी आणि त्‍याच्या आक्रमक शैलीसाठी प्रसिध्द आहे. त्‍याचे भारतासह जगभरात चाहते आहेत. काल मंगळवारी मुंबईमध्ये पार पडलेल्‍या भारत आणि ऑस्‍ट्रेलियामधील एकदिवसीय सामन्यात विराट कोहलीच्या एका चाहत्‍याने अनोखी हेअर स्‍टाईल करत, क्रिकेट शौकिनांचे लक्ष वेधून घेतले. त्‍याने हा हेअर कट आपल्‍या ट्विटरवरही पोस्‍ट केला आहे. 

अधिक वाचा : वॉर्नरला प्रतीक्षा विराटच्या 'डिनर इनव्हिटेशन'ची 

भारत हा क्रिकेट शौकिनांचा देश आहे. इथं आवडत्‍या खेळाडूला देवासमान मानण्यात येते. मग या दैवत खेळाडूसाठी त्‍याचे चाहते काहीही करण्यासाठी तयार असतात. आपण एखाद्या खेळाडूचे किती मोठे फॅन आहोत हे दाखवण्यासाठी चाहत्‍यांकडून अनेक प्रकारच्या शक्‍कल लढवल्‍या जातात. मग काय यातूनच त्‍यांना मोठी प्रसिध्दीही मिळत असते.

अधिक वाचा : विराटच्या पदरी ऑस्ट्रेलियात 'खुशी' तर मायदेशात 'गम'

आता हेच पहा ना काल मुंबईमध्ये भारत आणि ऑस्‍ट्रेलियामध्ये झालेल्‍या एकदिवसीय सामन्यामध्ये चिराग खिलारे या विराटच्या चाहत्‍याने आपल्‍या डोक्‍याच्या पाठीमागे केसांमध्ये विराट कोहलीचा चेहरा कोरून घेतला आहे. हा चेहरा इतका चपखल आणि सफाइदार पध्दतीने बनवण्यात आला आहे की, सुरूवातीला पाहताच खरे तोंड कोणते आणि आकृती कोणती हे समजतचं नाही.

विराटच्या या आकृतीत त्‍याचे डोळे, नाक, दाडी, हेअर स्‍टाईल एकदम परफेक्‍ट स्‍वरूपात कोरण्यात आली आहे. चिरागने स्‍टेडीयममध्ये तर सर्वांचे लक्ष आपल्‍याकडे वेधून घेतलेचं शिवाय त्‍याने ट्विटरवर हा फोटो पोस्‍ट करत, त्‍या खाली एक कॅप्शनही लिहिले आहे. तो म्‍हणतो की, विराट १९ वर्षाखालील खेळाडूंमध्ये खेळत असल्‍यापासून मला विराटचा खेळ आवडतो. मी विराटचा हृदयापासून डोक्‍यापर्यंत मोठा चाहता आहे असे त्‍याने म्‍हटले आहे.