होमपेज › Sports › विराटचा 'स्पिरीट ऑफ क्रिकेट' वर विश्वास बसेना

विराटचा 'स्पिरीट ऑफ क्रिकेट' वर विश्वास बसेना

Last Updated: Jan 15 2020 6:22PM
 

 

दुबई : पुढारी ऑनलाईन 

आयसीसीने नुकतेच 2019 ची वार्षिक पारितोषिके जाहीर केले. त्यात भारताचा सलामीवीर रोहित शर्माला क्रिकेटर ऑफ दी इयर हा पुरस्कार जाहीर झाला. तर भारताचा कर्णधार विराट कोहलीला स्पिरीट ऑफ क्रिकेट हा परस्कार जाहीर झाला. हे पुरस्कार जाहीर झाल्यानंतर दोघांनीही प्रतिक्रिया दिली. पण, यात विराटची प्रतिक्रिया लक्षवेधी ठरली. विराटने त्याला स्पिरीट ऑफ क्रिकेट पुरस्कार मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केले. तो म्हणला 'मला इतकी वर्षे चुकीच्या कारणांसाठी कायम आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले, त्यामुळे मला हा पुरस्कार मिळाल्याने आश्चर्य वाटले.'

भारताचा कर्णधार विराट कोहलीला 2019 चा आयसीसी स्पिरीट ऑफ क्रिकेट पुरस्कार मिळाल्याची घोषणा झाली. त्याला 2019 च्या वर्ल्डकपमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यादरम्यान प्रेक्षकांना स्मिथवर शेरेबाजी करण्यापासून रोखण्यासाठी हा पुरस्कार मिळाला आहे. स्मिथला चेंडू कुरतडल्याप्रकरणी एका वर्षाच्या बंदीला सामोरे जावे लागले होते. पण, त्यानंतर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये झोकात पुनरागमन केले होते. त्यानंतरही काही प्रेक्षकांकडून त्याला चिटर चिटर अशी शेरेबाजीला सामोरे जावे लागले होते. अशाच एका प्रसंगावेळी विराटने मैदानावरुनच प्रेक्षकांना असे न करण्याचे आवाहन केले होते.

वाचा : वॉर्नरला प्रतीक्षा विराटच्या 'डिनर इनव्हिटेशन'ची 

विराटने हा पुरस्कार मिळाल्यानंतर प्रतिक्रिया दिली. तो म्हणतो 'मी असे त्याची परिस्थिती पाहून असे केले. जो व्यक्ती अशा प्रकारच्या परिस्थितीतून बाहेर पडत असेल आणि आपण त्या परिस्थितीचा गैरफायदा घेणार असू तर हे योग्य नाही. तुम्ही सामना जिंकण्यासाठी बडबड करुन लक्ष विचलीत करु शकता, प्रतिस्पर्ध्याची खेचू शकता, पण एखाद्याची हुर्रे उडवणे मला पटत नाही मी या मताचा नाही.' 

वाचा : विराटच्या पदरी ऑस्ट्रेलियात 'खुशी' तर मायदेशात 'गम'

विराट पुढे म्हणाला 'प्रेक्षकांनी एखाद्या खेळाडूची हुर्रे उडवणे मला मान्य नाही. आपल्या प्रेक्षकांनी असे करणे अपेक्षित नाही. आपल्या सर्वांना याची जबाबदारी घेतली पाहिजे. आपण प्रतिस्पर्ध्यावर दबाव आणला पाहिजे पण, कोणावर भावनिक निशाणा साधणे चुकीचे आहे. हे कोणत्याही परिस्थितीत स्विकार्य नाही. मला कल्पना आहे की त्यावेळी स्मिथ कोणत्या परिस्थितून जात होता. पण, याचा फायदा घेणे चुकीचे आहे. याने काही फायदा होणार नाही. तसेच हे आपण एक देश म्हणून कसे आहोत याची प्रचिती देते. मला आनंद आहे की आयसीसीने ही गोष्ट कौतुक केले.'