Wed, Jan 20, 2021 00:20होमपेज › Sports › २०११ ची वर्ल्डकप फायनल फिक्स होती? श्रीलंकन पोलिसांना स्पष्ट खुलासा!

२०११ ची वर्ल्डकप फायनल फिक्स होती? श्रीलंकन पोलिसांना स्पष्ट खुलासा!

Last Updated: Jul 03 2020 7:19PM
कोलंबो : पुढारी ऑनलाईन 

भारताने श्रीलंकेचा 6 गडी राखून पराभव करत 2011 च्या वर्ल्डकपवर आपले नाव कोरले होते. पण, गेल्या काही दिवसांपूर्वी श्रीलंकेच्या माजी क्रीडामंत्र्यानेच हा सामना फिक्स होता असा दावा केला. त्यामुळे क्रीडा वर्तुळात एकच खळबळ उडाली. अखेर या वादावर श्रीलंकेच्या पोलिसांनीच पडदा टाकला. त्यांनी आज (दि.3) या प्रकरणाची सुरु असलेली फौजदारी चौकशी पुराव्या अभावी बंद केली. त्यांनी श्रीलंकेच्या खेळाडूंविरोधात मॅच फिक्सिंग करुन विरुद्ध संघाला सामना जिंकू दिल्याचा कोणताही पुरावा आढळलेला नाही असे स्पष्ट केले. 

या प्रकरणी श्रीलंकचे माजी निवड समिती अध्यक्ष अरविंद डिसिल्वा, माजी कर्णधार कुमार संगकारा आणि सलामीवीर उपल थरंगा यांची याच आठवड्यात चौकशी करण्यात आली. याबाबत वरिष्ठ अधिकारी त्यांच्या स्पष्टीकरणाने आमचे समाधान झाले आहे असे म्हणाले होते. त्यांनी 'अखेरच्या सामन्यात संघात करण्यात आलेल्या बदलाचे जे स्पष्टीकरण दिले आहे त्यांनी आमचे समाधान झाले आहे. आम्हाला काही चुकीचे झाले आहे याबाबत कोणताही पुरवा मिळालेला नाही आता ही चौकशी बंद करण्यात येत आहे.'  असे सांगितले. 

बीसीसीआय म्हणते 'त्याशिवाय' आम्ही विवोसोबतचा करार मोडणार नाही!

या प्रकरणी 2011 च्या संघाचा उपकर्णधार महेला जयवर्धने ज्यावेळी विशेष चौकशी समितीसमोर आपले स्टेटमेंट देण्यासाठी गेला होता. त्यावेळी अचानक या प्रकरणाची चौकशी बंद करण्यात आली. यावेळी जयवर्धनेने पत्रकारांना सांगितले की आम्ही चौकशीला संपूर्ण सहकार्य करणार आहे. पण, चौकशी अधिकाऱ्यानी त्याचा जबाब घेण्यास नकार दिला आणि नंतर येण्यास सांगितले. जयवर्धनेला संगकाराची गुरुवारी जवळपास 10 तास कसून चौकशी केल्यानंतर बोलवण्यात आले होते.

या चौकशी प्रकरणामुळे सोशल मीडियावर अध्यक्ष गोताबाया राजपक्षे यांच्या सरकराविरोधात जोरदार आवाज उठवण्यात आला होता. ज्यावेळी 2011 ला क्रीडा मंत्री असलेल्या महिंदनंदा अलुथगामगे यांनी श्रीलंकेने 2011 ची वर्ल्डकप फायनल प्रतिस्पर्ध्यांना दिली होती असा आरोप केल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. या आरोपानंतर श्रीलंकेचे अजून एक माजी क्रीडा मंत्री हरिन फर्नांडो ज्यांनी भ्रष्टाचार विरोधी कायदा आणला होता त्यांनी अलुथगामगे यांनी दिग्गज क्रिकेटपटूंवर केलेल्या खोट्या आरोपवरुन त्यांच्यावर गुन्हा दाखल करवा अशी मागणी केली आहे. दरम्यान, ही चौकशी बंद झाल्यानंतर अलुथगामगे यांनी त्वरित कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. 

टेस्ट चॅम्पियनशिप: आठ जुलैपासून इंग्लंड-विंडीज भिडणार

नवीन कायद्यानुसार मॅच फिक्सिंग हा फौजदारी गुन्हा करण्यात आला आहे. नव्या कायद्यानुसार जास्तीजास्त 5 लाख 55 हजार अमेरिकी डॉलर दंड आणि 10 वर्ष तुरुंगवास अशी शिक्षा होणार आहे. दरम्यान, इंग्लंडमधील मेलबर्न क्रिकेट क्लब सारख्या प्रथितयश क्लबचा अध्यक्ष असलेल्या संगकाराने अलुथगामगे यांना त्यानी केलेले आरोपाबाबत आयसीसीलाशीही बोलावे असे सांगितले होते.