Thu, May 28, 2020 12:23होमपेज › Sports › सचिनने दिली पहिल्या प्रेमाची कबुली, अंजली नाही तर..

सचिनने दिली पहिल्या प्रेमाची कबुली

Last Updated: Feb 14 2020 4:56PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आज व्हॅलेंटाईन डेला सोशल मीडियावरुन आपल्या पहिल्या प्रेमाची कबुली दिली. मात्र या कबुलीजबाबामुळे सचिन तेंडुलकर अडचणीत येण्याची शक्यता आहे असे सर्वांनाच वाटेल. कारण त्याचे पहिले प्रेम अंजली तेंडुलकर नसून दुसरेच कोणी तरी आहे. 

गांगुली म्हणतात सचिन तुझं नशीब चांगलं, सचिनने दिले भन्नाट उत्तर

सचिनने सोशल मीडियातून आपल्या पहिल्या प्रेमाचा उलगडा केला. याबाबतचा व्हिडिओही त्याने शेअर केला. घाबरु नका तेंडुलकरांच्या घरात यामुळे कोणताही राडा होणार नाही. कारण अंजली तेंडुलकर यांना हे सचिनचं पहिलं प्रेम मान्य आहे. विशेष म्हणजे या पहिल्या प्रेमाची सचिनने लग्नाआधीच कल्पना दिली होती. त्यावेळी बहुदा त्याने हे आपले पहिले प्रेम आपण आयुष्भर सांभाळून ठेवणार असल्याची कल्पना अंजलीला दिली असणार. कारण अंजलीला सचिनच्या प्रेमातील मोठा तिचा वाटा मान्य केला आहे. 

सरावात विहारीने सावरले पण, युवा फलंदाजांकडून निराशा

कोण आहे सचिनचे पहिले प्रेम? उत्तर तुमच्या परिचयाचे आहे 'क्रिकेट' सचिनने फेसबुकवर नेटमध्ये फलंदाजी करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्याला कॅप्शन दिले आहे 'माझं पहिलं प्रेम!'